IPL 2023 साठी MS धोनी पुन्हा एक्शन मोड मध्ये
या सीझनमध्ये आयपीएलमध्ये धोनी चेन्नई सुपर किंग्जचे नेतृत्व करणार आहे.त्याच्या नेतृत्वाखाली संघाला आणखी एक विजेतेपद मिळवून देण्याचा त्याचा प्रयत्न असेल. आयपीएलच्या मिनी लिलावात चेन्नईने बेन स्टोक्ससारख्या अष्टपैलू खेळाडूला विकत घेऊन आपला संघ आणखी मजबूत करण्याचे काम केले आहे.क्रिकेटपासून दूर असलेला महेंद्रसिंग धोनीने बॅट उचलली असून आयपीएलच्या स्पर्धेसाठी सराव सुरु केला असून पुन्हा एकदा आयपीएलमध्ये धमाल करताना दिसणार आहे. धोनीच्या सरावाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये धोनी नेटवर सराव करताना दिसत आहे.धोनीची फॅन फॉलोइंग भारतातच नाही तर जगभरात आहे. अशा परिस्थितीत या सर्व चाहत्यांना पुन्हा एकदा धोनीची धमाकेदार फलंदाजी पाहायला मिळणार आहे.
धोनीने चेन्नई सुपर किंग्जला चार वेळा विजेतेपद मिळवून दिले आहे. गेल्या वर्षी त्याने चेन्नई सुपर किंग्जचे कर्णधारपद सोडले होते.त्यावेळी चेन्नईची धुरा रवींद्र जडेजाने सांभाळली
आयपीएल 2023 साठी चेन्नई संघ चेन्नई सुपर किंग्ज संघ - एमएस धोनी (कर्णधार), डेव्हॉन कॉनवे, ऋतुराज गायकवाड, बेन स्टोक्स, काइल जेम्सन, निशांत सिंधू, अजिंक्य रहाणे, शेख रशीद, भगत वर्मा आणि अजय मंडल, अंबाती रायुडू, सुभ्रांशु सेनापती, मोईन अली, शिवम दुबे राजवर्धन हंगरगेकर, ड्वेन प्रिटोरियस, मिचेल सँटनर, रवींद्र जडेजा, तुषार देशपांडे, मुकेश चौधरी, मथिशा पाथिराना, सिमर देशपांडे, दीपक चहर, प्रशांत सोळंकी, महेश तिक्ष्णा.
Edited By - Priya Dixit