1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By

गांगुलीच्या त्यागामुळे धोनी मोठा झाला: सेहवाग

भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी जगातील सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी ऐक आहे. धोनीच्या बाबतीत टीम इंडियाचा माजी स्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवागने खुलासा केला आहे. धोनी आज जिथे आहे त्यामागे सौरव गांगुलीचा त्याग आहे, असे सेहवागने म्हटले.
 
तिसर्‍या क्रमांकावर नवीन खेळाडूंना संधी द्यायची, असा प्लॅन कर्णधार असताना सौरवने तयार केला होता. सौरव स्वत: सलामीला फलंदाजी करायचा. मात्र माझ्यासाठी त्याने ती जागा सोडली. त्याचप्रमाणे 2005 साली गांगुलीने विशाखापट्टणम वनडे मध्ये तिसर्‍या क्रमांकावर धोनीला पाठवण्याचा निर्णय घेतला अशी माहिती सेहवाने दिली.
 
स्वत:ची सेट जागा सोडणारे आणि नव्या खेळाडूला संधी देणार खूप कमी कर्णधार असतात. दादा नसता तर धोनी मोठा खेळाडू होऊ शकला नसता. दादाने नेहमी नवीन खेळाडूंना संधी दिली असेही सेहवाग ‍म्हणाला.
 
5 एप्रिल 2005 रोजी झालेल्या विशाखापट्टणम वनडेत धोनीने पाकिस्तानविरूद्ध तिसर्‍या क्रमांकावर फलंदाजी करताना 148 धावा केल्या होता. त्यानंतर धोनी स्फोटक खेळाडू म्हणून पुढे आला. ही त्याची दुसरी सर्वाधिक धावसंख्या होती. त्यापूर्वी धोनीने श्रीलंकेविरूद्ध 183 धावा ठोकल्या होत्या.