गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: गुरूवार, 20 ऑगस्ट 2020 (17:14 IST)

म्हणून धोनीने ट्विट करुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी याने गुरुवारी ट्विट करुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. १५ ऑगस्टला धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली होती. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेकांनी धोनीला भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या होत्या. नरेंद्र मोदी यांनी धोनीला पत्र पाठवून भारतीय क्रिकेटसाठी दिलेल्या योगदानासाठी त्याचे कौतुक केले होते.
 
या शुभेच्छांसाठी महेंद्रसिंह धोनीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत. धोनीने म्हटले आहे की, एक कलाकार, एक सैनिक आणि एक खेळाडू यांना प्रशंसेची भूक असते. त्यांची मेहनत आणि त्यागाची प्रत्येकाने दखल घ्यावी, असे त्यांना वाटत असते. तुम्ही केलेली प्रशंसा आणि शुभेच्छांसाठी आभारी आहे, असे धोनीने सांगितले.
 
यापूर्वी केंद्रीय मंत्री अमित शाह यांनीही धोनीच्या निवृत्तीनंतर त्याला आगामी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या होत्या.