बुधवार, 14 जानेवारी 2026
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: मुंबई , सोमवार, 12 डिसेंबर 2016 (10:23 IST)

इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटीत भारताचा दणदणीत विजय

मुंबई टेस्ट मॅच
इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटीत भारताचा ३६ धावा आणि १ डावाने दणदणीत विजय. दुस-या डावात इंग्लंडचे सर्व गडी १९५ धावांत बाद. पाचव्या दिवसाच्या खेळाला सुरुवात झाल्यानंतर इंग्लंडचे उर्वरित चार फलंदाज अवघ्या 13 धावात तंबुत परतले आणि इंग्लंडचा डाव 195 धावांवर संपुष्टात आला. चौथ्या कसोटीत एकूण मिळून 12 बळी घेणा-या रविचंद्रन अश्विनने पाचव्या दिवशी इंग्लंडचे शेपूट वळवळून दिले नाही. बेअरस्टो, वोक्स, राशिद, अँडरसन या इंग्लंडच्या शेवटच्या चारही फलंदाजांना अश्विनने माघारी धाडले. कसोटी सामन्यात रविचंद्रन अश्विन ठरला सामनावीर. भारताने इंग्लंडचा 1 डाव 36 धावांनी पराभव करुन मालिकेत 3-1 अशी विजयी आघाडी घेतली.