मंगळवार, 26 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: शनिवार, 6 मार्च 2021 (16:33 IST)

IND vs ENG, 4th Test Day -3: भारताने डाव आणि 25 धावांनी विजय मिळवत चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात स्थान मिळवले

ndia vs england
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यात भारताने डाव आणि 25 धावांनी विजय मिळविला. यासह टीम इंडियाने कसोटी मालिका 3-1 अशी जिंकली. चौथ्या कसोटीतील विजयासह भारतीय संघानेही विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात आपले स्थान निश्चित केले आहे. दुसर्या् डावात 135 धावा करुन इंग्लंडचा संघ ऑलआऊट झाला. अक्षर पटेल आणि रविचंद्रन अश्विन यांनी दुसर्यार डावात प्रत्येकी पाच गडी बाद केले. यापूर्वी इंग्लंडवर भारतीय संघाला 160 धावांची भक्कम आघाडी होती आणि त्याने पहिल्या डावात 365 धावा केल्या. ऋषभ पंतने 101 धावांची शानदार खेळी करत संघासाठी शानदार फलंदाजी केली तर वॉशिंग्टन सुंदर 96 धावांवर नाबाद होता. पहिल्या डावात 205 धावा करुन इंग्लंड बाद झाला.