सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: सोमवार, 1 मार्च 2021 (12:31 IST)

लस घेताना मास्क न घातल्यामुळे पीएम मोदींवर टीका

आजपासून देशामध्ये करोना लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरु झालाय. आणि त्यातून अचानक घडलेली बाब म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज सकाळी सात वाजताच दिल्लीमधील ऑल इंडिया इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्सेस रुग्णालयामध्ये लसीची पहिला डोस घेतला. पीएम मोदींनी वॅक्सीनेशनचा फोटो आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे. या फोटोत त्यांच्यासोबत दोन नर्सही दिसत आहेत. मोदींनी हसत लस घेत असल्याचा फोटो शेअर केला आहे. मात्र विशेष लक्ष देण्यासारखी बाब म्हणजे यात मोदींच्या चेहऱ्यावर मास्क नसल्याने अनेकांनी प्रश्न विचारण्यास सुरुवात केली आहे. नेटकर्‍यांनी टीका करण्यास सुरुवात केली आहे. 
 
अनेक यूजर्सने मोदींच्या पोस्टावर मास्क न घातल्याबद्दल आक्षेप नोंदवला आहे. मोदींनी ट्विटर करत लिहिले आहे की “एम्स रुग्णालयात करोनाचा पहिला डोस घेतला. करोनाविरोधातील जागतिक लढाईला बळकट करण्यासाठी आपल्या डॉक्टरांनी आणि वैज्ञानिकांनी द्रुत वेळात कसे कार्य केले हे उल्लेखनीय आहे. तसेच जे लोकं लसीकरणासाठी पात्र आहेत त्यांनी लस घ्यावी असं मी आवाहन करतो, आपण मिळून भारताला करोनामुक्त करुयात”असे मोदी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले.
 
या पोस्टनंतर काहींनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी लस घेताना मास्क घातलेला हे दाखवणारा फोटोही पोस्ट केला आहे. तसेच काहींना कैमराजीवी म्हणत फोटोसाठी मास्क काढणे आवश्यक आहे का असा प्रश्न विचारला आहे. 
 
दरम्यान, अनेकांनी मोदींचे कौतुक देखील केले आहे की ज्यामुळे इतरांना वॅक्सीनेशनसाठी प्रोत्साहन मिळेल असे म्हटले जात आहे. 
 
उल्लेखनीय आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सकाळी सातच्या सुमारास एम्सला भेट दिली. सर्वसामान्यांना त्यांच्यामुळे काही अडचण होऊ नये अशी त्यांची इच्छा होती.

मिळालेल्या माहितीनुसार मोदींनी लस देणाऱ्या नर्सचे नाव पी निवेदिता असं होतं. निवेदा या मूळच्या पुद्दुचेरीच्या आहेत. तसेच निवेदा यांच्यासोबत असणाऱ्या दुसऱ्या नर्सचे नाव रोसामा अनिल असं असून त्या केरळच्या आहेत.