गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 8 फेब्रुवारी 2021 (16:41 IST)

संजय राऊत यांचं सूचक ट्विट, शायरीतून केली टीका

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी एक सूचक ट्विट केलंय. गृहमंत्री अमित शाह काल सिंधुदुर्गात होते. त्यावेळी त्यांनी बाळासाहेब गेले आणि शिवसेनेनं सिद्धांत बुडवले, अशी टीका केली होती. त्यावर आता संजय राऊतांनी ट्विट करून टीका केलीय. तुफान ज्यादा हो तो, कश्तियां डूब जाती है...और घमंड ज्यादा हो तो हस्तियाँ डूब जाती है अशी शायरी त्यांनी ट्विट केलंय.
 
संजय राऊत यांनी राज्यसभेत भाजप सरकारवर जोरदार टीका केली आहे. गेल्या सहा वर्षांपासून खोट्यालाही खरे करण्याचा प्रयत्न केला जात आहे. हे असेच चालले आहे. पत्रकार राजदीप सरदेसाई, काँग्रेस नेते शशी थरुर यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात येतो.  जो खरं बोलतो किंवा लिहितो त्याला गद्दार, देशद्रोही संबोधलं जाते. जो सरकारला प्रश्न विचारतो, त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा ठोकला जातो. पद्म पुरस्कार विजेते  राजदीप सरदेसाई, काँग्रेस नेते शशी थरूर, दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलनावर लिहिणारे पत्रकार मनजीत सिंह आणि अशा अनेक लेखक, पत्रकारांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे संजय राऊत यांनी राज्यसभेत सांगितले.