शुक्रवार, 28 नोव्हेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 2 फेब्रुवारी 2021 (16:20 IST)

संजय राऊत यांनी दिल्लीत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांची घेतली भेट

Sanjay Raut
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिल्लीत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांची भेट घेतली आहे.  ते गाझीपूर सीमेवर पोहोचले होते. यावेळी त्यांनी शेतकरी नेते राकेश टिकैत यांची भेट घेतली. दरम्यान तिकरी बॉर्डवर पोलिसांनी शेतकऱ्यांना अडवण्यासाठी मोठे खिळे लावले आहेत. तसंच बॅरिकेट्सची भिंतच उभारली आहे. यावरुनही संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला आहे.
 
यावेळी संजय राऊत यांनी सांगितलं की, “शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीसकाळी आम्हा सर्व खासदारांना आदेश दिला. ज्याप्रकारे सरकारतर्फे अन्याय, दहशत केली जात आहे, त्यांच्या पाठीशी उभं राहणं, पाठबळ देणं आपलं कर्तव्य आहे. उद्धव ठाकरे यांचा निरोप, संवेदना घेऊन आपण येथे पोहोचलो आहेत”.
 
“देशातील प्रत्येक राजकीय पक्षाने येथे येऊन आपल्या भावना व्यक्त करण कर्तव्य आहे,” असं मत यावेळी त्यांनी व्यक्त केलं. “राकेश टिकैत आणि आम्ही आधी दूरध्वनीवरुन बोललो होतो. पण फोनवरुन बोलणं आणि प्रत्यक्षात मैदानात येऊन पाठिंबा देणं हे महत्वाच आहे. यामुळे प्रत्यक्ष रणभूमीवर येऊन पाठिंबा जाहीर केला,” अशी माहिती संजय राऊत यांनी यावेळी दिली.