बुधवार, 1 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 1 फेब्रुवारी 2021 (15:47 IST)

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊतांची गळाभेट, चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रिया

शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या लेकीचा साखरपुडा पार पडला आहे.  यावेळी शुभकार्य म्हणून भाजपा नेते विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीशिवसेना नेते संजय राऊतांची गळाभेट घेतली. यावेळी “शत्रूही एकमेकांची गळाभेट घेतात, दोन मित्र भेटल्यानंतर मिठी मारतात” अशी प्रतिक्रिया भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. भाजपा व शिवसेना अनेक वर्ष मित्र होते, मात्र भाजपने शब्द फिरवला म्हणून शिवसेनेने राष्ट्रवादी व कॉँग्रेस सोबत मिळून सत्ता स्थापन केली आहे.
दुश्मन भी गले मिल जाते है….
 
“आपल्या देशाची संस्कृती आहे, दुष्मन जरी असला तरी तो त्या जागी, एरवी आपण एकमेकांना प्रेम देतो. देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊतांच्या मुलीच्या साखरपुड्याला जायलाच हवं होतं” असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
 
“पवारांना आदराने नमस्कार होणारच”
“राजकीय विषय वेगळे असले तरी स्वाभाविकपणे दोन मित्र भेटल्यावर आपण एकमेकांची गळाभेट घेतो. राजकारणात मैत्री असायलाच हवी, जरी आम्ही पवार साहेबांवर टीका टिपण्णी केली, तरी आम्हाला पश्चिम महाराष्ट्रात काम वाढवायचं असेल तर त्यांच्यावर टीका टिप्पणी केल्याशिवाय आम्ही वाढूच शकत नाही. पवार साहेब भेटल्यावर मी त्यांना वाकून नमस्कार करणारच, ही आमची संस्कृती आहे” असंही चंद्रकांतदादा म्हणाले.