मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 23 जानेवारी 2021 (19:47 IST)

देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चेनंतरही अण्णा हजारे उपोषणावर ठाम

शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत.
 
केंद्रातील भाजप सरकारविरोधात अण्णा हजारे यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. त्यामुळे राज्यातील भाजप नेत्यांकडून अण्णांची मनधरणी करण्याचं काम सुरू आहे.
 
विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, माजी मंत्री आणि भाजप नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी शुक्रवारी (22 जानेवारी) अण्णा हजारेंची राळेगणसिद्धी इथं भेट घेतली. पण, ती निष्फळ ठरली आहे. 
 
फडणवीस यांच्या भेटीपूर्वी विखे पाटील आणि अण्णा हजारे यांच्यात तासभर चर्चा झाली. त्यानंतर फडणवीस, विखे-पाटील आणि अण्णांमध्ये पुन्हा एकदा दीड तास बंद दाराआड चर्चा झाली. यावेळी गिरीश महाजनही उपस्थित होते.