मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : शुक्रवार, 29 जानेवारी 2021 (23:09 IST)

आता फार काळ विरोधी पक्षात राहायचं नाही- देवेंद्र फडणवीस

आपल्याला फार काळ विरोधी पक्षात राहायचं नाही. फक्त जोपर्यंत विरोधी पक्षामध्ये आहात तोपर्यंत विरोधकांची भूमिका निभावत राहू, असं वक्तव्य विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.
 
ते गुरुवारी (28 जानेवारी) प्रवीण दरेकर यांच्या कारकिर्दीचा आढावा घेणाऱ्या 'वर्षभराचा लेखाजोखा' या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात बोलत होते.
 
यावेळी त्यांनी कोरोना संकटाची हाताळणी, मेट्रो कारशेड आणि अन्य मुद्द्यांवरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केले.
 
काही लोकांच्या इगोमुळे पुढची चार वर्षे मेट्रो सेवा सुरु होणार नाही, असंही त्यांनी म्हटलं.