बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 29 जानेवारी 2021 (16:16 IST)

युवा सेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांची मनसेवर खोचक टीका

मुंबईत वांद्रे येथे एमआयजी क्लबमध्ये आज मनसेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक सुरू आहे. या बैठकीत मनसेप्रमुखराज ठाकरे आणि पुत्र अमित ठाकरे यांच्यासह मनसेचे अनेक महत्वाचे नेते देखील उपस्थित आहे. काही दिवसांपूर्वी देखील राज ठाकरेंच्या मार्गदर्शनाखाली मनसेची एक महत्वाची बैठक पार पडली होती. मात्र या बैठकीत राज ठाकरे यांची सून आणि अमित ठाकरे यांनी पत्नी मिताली ठाकरे देखील उपस्थित राहिल्याने याची सर्वत्र चर्चा रंगली होती. याचपार्श्वभूमीवर शिवसेनेच्या युवा सेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांनी मनसेवर खोचक टीका केली आहे.    
 
शॅडो' चे पण 'माझे कुटुंब - माझी जबाबदारी', असं ट्विट करत वरुण सरदेसाई यांनी मनसेवर खोचक टीका केली आहे. त्यामुळे आगामी काळात शिवसेना आणि मनसे यांच्यातील वाद आणखी चिघळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ठाकरे कुटुंबावर आतापर्यंत वैयक्तिक टीका टाळणाऱ्या शिवसेननं पहिल्यांदाच राज ठाकरेंच्या कुटुंबाबाबत जाहीर टीका केली आहे.