राज्याचे मुख्य सचिव संजय कुमार यांना कोरोना
राज्याचे मुख्य सचिव संजय कुमार यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आलाय. सध्या मुख्य सचिव घरीच क्वारंटाईन आहेत.मुख्य सचिव हे अनेक बैठकांना हजर असल्याने प्रशासनाची सध्या चिंता वाढली आहे.
मागील आठवड्यात मंगळवारी २२ सप्टेंबर रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीला ते हजर होते. या पार्श्वभुमीवर मंत्रालयात आता विशेष काळजी घेतली जाण्याची शक्यता आहे. दोन दिवसांपूर्वी त्यांना सौम्य लक्षण जाणवत असल्याने संजय कुमार यांनी स्वतःची कोरोना चाचणी करून घेतली होती. सौम्य लक्षणे जाणवू लागल्यापासून ते स्वतः विलगीकरणात गेले होते.
दुसरीकडे काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील पॉझिटिव्ह आल्याने राज्यातील काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते अडचणीत आले आहेत..गुरुवारी २४ सप्टेंबर रोजी एक. के. पाटील मुंबईत होते. काँग्रेसच्या टिळक भवन या प्रदेश कार्यालयात त्यांनी राज्यातील नेत्यांबरोबर बैठकीही घेतली होती.