मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: शुक्रवार, 25 सप्टेंबर 2020 (08:40 IST)

कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढू लागली, दिवसभरात कोरोनाचे १९,१६४ नवे रुग्ण

राज्यात गुरुवारी दिवसभरात कोरोनाचे १९,१६४ रुग्ण वाढले आहेत. तर गेल्या २४ तासात १७,१८४ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर ४५९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात एकूण कोरोना संक्रमितांची संख्या १२,८२,९६३ वर पोहोचली आहे. राज्यात आतापर्यंत ९,७३,२१४ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून अजूनही राज्यात २,७४,९९३ रुग्ण उपचार घेत आहेत.
 
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढू लागली आहे. राज्यात कोरोना रुग्णांचा रिकव्हरी रेट ७५.८६ % टक्के इतका झाला आहे. तर मृत्यूदर २.६८ टक्के इतका आहे.
 
आतापर्यंत राज्यात ६१,९०,३८९ जणांची कोरोना टेस्ट झाली असून १२,८२,९६३ जणांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे.
 
सध्या राज्यात १८,८३,९१२ जण होम क्वारंटाईन असून ३३,४१२ जण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत.