सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 22 सप्टेंबर 2020 (08:37 IST)

रेल्वे खुली केली तर आणखी प्रादुर्भाव वाढेल : अनिल परब

सर्व गोष्टींची काळजी करून रेल्वे खुली करावी लागते. आधीच प्रादुर्भाव वाढतो आहे. त्यामुळे रेल्वे खुली केली तर आणखी प्रादुर्भाव वाढेल. टप्प्याने आम्ही खुली करतो आहे. आता रेल्वेच्या फेर्‍या वाढवल्या आहेत. याला कोणाला राजकीय स्वरुप द्यायचं असेल तर देऊ द्या.' परिवहन मंत्री अनिल परब यांनी म्हटलं आहे. 
 
अनिल परब यांनी पुढे म्हटलं की, एसटी पूर्ण क्षमतेने सुरू झाली असली तरी प्रवासी अजूनही प्रवास करायला धजावत नाहीत. दोन महिने उत्पन्न नसले तरी आपण राज्य सरकारकडून ५०० कोटी रुपये घेऊन पगार दिले होते. आताही आम्ही राज्य सरकारकडे पैसे मागितले आहेत. राज्य सरकारकडे २२०० कोटी रुपयांची मागणी केली आहे. यात इंधन, पगार, सुटे भाग यासाठी पैसे मागितले आहेत. यातील ५५० कोटी मिळाले आहेत, उर्वरित लवकर मिळतील. कोविडचा भत्ता द्यायचा शिल्लक आहे, कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना मदत देणे बाकी आहे ते लवकर आम्ही देऊ.'