मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 23 जानेवारी 2021 (22:02 IST)

चित्रा वाघ यांनी घेतली विश्वास नांगरे पाटील यांची भेट,

रेणू शर्मा यांच्याविरोधात कारवाईची केली मागणी  
 सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप करत तक्रार केल्यानंतर ती पुन्हा परत घेतली. धनंजय मुंडे यांच्यावर खोटा आरोप केल्या प्रकरणी रेणू शर्मा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करा, अशी मागणी भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केली आहे. मुंबईचे सह पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांची भेट घेऊन चित्रा वाघ यांनी रेणू शर्मा यांच्याविरोधात कारवाईची मागणी केली आहे. त्याचबरोबर प्रसाद लाड यांनीही अशा प्रवृत्तींना वेळीच आळा बसला पाहिजे. त्यासाठी रेणू शर्मा यांच्यावर कारवाई व्हावी, असं म्हटलं आहे.
 
हे प्रकरण धनंजय मुंडे किंवा रेणू शर्मा यांच्यापुरतं मर्यादित नाही. या प्रकरणात योग्य कारवाई झाली नाही तर त्याचे दूरगामी परिणाम राज्यातील लेकीबाळींना भोगावे लागतील. त्यासाठी तात्काळ कारवाई व्हावी, अशी मागणी चित्रा वाघ यांनी नांगरे-पाटील यांची भेट घेऊन केली आहे. नंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचे आरोप करुन ते मागे घेतल्यामुळे समाजात चुकीचा संदेश जाऊ शकतो. यामुळे खऱ्या पीडितांकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलेल, असे म्हणत रेणू शर्मा यांच्यावर कारवाई करावी, असं चित्रा वाघ म्हणाल्या.