शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 23 जानेवारी 2021 (21:50 IST)

खुशखबर, पहिल्या टप्प्यातली नोकर भरती सुरु

राज्यात नोकरभरतीला सुरुवात झाली आहे. गृह विभागात ५ हजार २९७ पदांसाठी भरती केली जात आहे, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. आरोग्य आणि गृह खात्यांमध्ये मिळून १३, ८०० पदांची पहिल्या टप्प्यात भरती केली जात आहे. तर दुसऱ्या टप्प्यात ७ हजार २३१ पदांची भरती केली जाणार आहे. ही भरती प्रक्रिया लवकर पूर्ण होईल, असे देशमुख यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
 
 
कोरोनामुळे राज्यातील भरती प्रक्रिया रखडली होती. यामुळे अनेक बेरोजगार तरुण नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत. पण आता राज्यात नोकरभरतीला सुरुवात झाली असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी जाहीर केले आहे.