मंगळवार, 7 फेब्रुवारी 2023
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified शनिवार, 23 जानेवारी 2021 (21:31 IST)

'राष्ट्रवादी परिवार संवाद दौऱ्या'ची घोषणा, राज्यातील १४ जिल्ह्यांमध्ये कार्यकर्त्यांशी संवाद साधणार

"प्रत्येक पक्षाला पक्ष वाढविण्याचा अधिकार आहे. मात्र, स्वतंत्र निवडणूक लढविण्याचा अजिबात विचार नाही. आम्ही महाविकास आघाडीत आहोत आणि भाजपला पराभूत करणं हेच आमचं ध्येयं आहे", असं जयंत पाटील म्हणाले. ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. 
 
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी 'राष्ट्रवादी परिवार संवाद दौऱ्या'ची घोषणा केली आहे. या दौऱ्यात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील राज्यातील १४ जिल्ह्यांमध्ये कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. आगामी पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पाटील यांच्या दौऱ्याला महत्व प्राप्त झालं आहे. 
 
"राष्ट्रवादी परिवार संवाद दौर्‍याच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस आणखी एक पाऊल पुढे जात असून १७ दिवसांच्या या दौऱ्यात विदर्भ व खान्देशातील १४ जिल्हे, ८२ मतदारसंघाचा आढावा घेतला जाणार आहे. शिवाय कार्यकर्त्यांच्या १३५ बैठका व १० जाहीर सभा होणार आहेत", अशी माहिती जयंत पाटील यांनी दिली. गडचिरोतील अहेरीपासून ही परीवार संवाद यात्रा काढली जाणार असल्याचंही पाटील यांनी सांगितलं.