बुधवार, 17 सप्टेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 28 जानेवारी 2021 (15:39 IST)

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी उद्धव ठाकरे आहेत, हे सुद्धा कर्नाटकच्या सरकारने विसरू नये : संजय राऊत

The Karnataka government
कर्नाटकचा प्रश्न हा केवळ कर्नाटकचा नसून, हा दोन राज्यांमधील सीमा प्रश्न आहे. हे कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांना कळाले पाहिजे. त्यांनी थोडा इतिहास समजून घेतला पाहिजे. कायद्याने काय व्हायचं ते होईलचं, पण आता महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी उद्धव ठाकरे आहेत, हे सुद्धा कर्नाटकच्या सरकारने आता विसरू नये, अशा शब्दात शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी फटकारले आहे. 
 
बेळगाव महाराष्ट्र-कर्नाटक सीमा या विषयावर ज्या पद्धतीनं पावलं टाकायला पाहिजेत, ती टाकायचला सुरूवात झालेली आहे. कुणी तिकडं काही बरळलं तरी इकडं आम्हाला फरक पडत नाही, अशा शब्दांमध्ये शिवसेना खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमा वादावर माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे.