शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 27 जानेवारी 2021 (22:18 IST)

कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांची मुक्ताफळे, म्हणे मुंबई कर्नाटकचा भाग होता, मुंबईवर आमचा हक्क आहे

बेळगाव म्हणजे कर्नाटक व्याप्त महाराष्ट्र आहे. कर्नाटक सरकारनं बेळगावचं नामकरण बेलगाम करून तिथे बेलगामपणे अत्याचार सुरू केले आहेत. याविरोधात आपण पक्षीय मतभेद विसरून एकत्र येण्याची गरज असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. 'महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद- संघर्ष व संकल्प' पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात उद्धव ठाकरे यांनी हे वक्तव्य केलं आहे. उद्धव ठाकरेंच्या या विधानानंतर कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी पुन्हा एकदा मुक्ताफळे उधळली आहे. 
 
लक्ष्मण सवदी माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले की, बेळगाव सोडा, मुंबई पण कर्नाटकचा भाग होता, मुंबईवर पण आमचा हक्क आहे. मुंबई प्रदेश हा केंद्रशासित करा, अशी मागणी आम्ही केंद्र सरकारकडे करणार आहोत,' असं विधानही लक्ष्मण सवदी यांनी केलं आहे. लक्ष्मण सवदी यांच्या या वादग्रस्त विधानानंतर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात येत आहे.