गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 8 फेब्रुवारी 2021 (20:54 IST)

पण पंतप्रधानांनी चर्चेसाठी पुढाकार घेतला पाहिजे : संजय राऊत

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या टीकेवर भाष्य केलं आहे. यात देशाच्या पंतप्रधानांच्या भूमिकेचा आदर राहिला पाहिजे. राजकीय मतभेद एका बाजूला, पंतप्रधान सांगत आहेत तेव्हा त्यावर आम्ही विश्वास ठेवतो. पण पंतप्रधानांनी चर्चेसाठी पुढाकार घेतला पाहिजे, शेतकरी अज्ञान आहेत. त्यांना त्यांची जमीन, पीक, एमएसपी यापलीकडे काही माहिती नाही. तुम्ही सगळे ज्ञानदेव आहात, तुम्ही भिंत चालवू शकता….भिंत चालवा आणि गाझीपूरला चला,” असं आवाहन संजय राऊत यांनी केलं आहे.
 
“जर आंदोलन हायजॅक होत आहे असं वाटत असेल तर चार शेतकरी नेत्यांना बोलवा आणि थेट चर्चा करा. तीन महिन्यांपासून आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांची दखल घेणार की नाही? संसदेत भाषण केलं, बाहेर भाषण केलं पण निष्पन्न काय झालं?,” अशी विचारणा संजय राऊत यांनी केली आहे.