मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 8 फेब्रुवारी 2021 (20:52 IST)

सचिन आमच्या शेतकरी बापासाठी कधी ट्विट करशील?, फलक हाती घेऊन आंदोलन

कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमांवर देशभरातील शेतकऱ्यांकडून आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाबाबत बॉलिवूड आणि क्रीडा क्षेत्रातील दिग्गजांकडून एकाचवेळी एकाच भाषेत ट्विट करण्यात आले.  यामध्ये भारतरत्न सचिनत तेंडुलकरचाही  समावेश होता. आमचा अंतर्गत मामला असल्याचे सांगत सार्वभौमत्वावर तडजोड होऊ शकत नाही अशा प्रकारचे ट्विट सचिनने केल्यानंतर चांगलीच टीका झाली.
 
आता याच मुद्यावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रवक्ते रणजीत बागल यांनी सोमवारी  सचिन तेंडुलकरच्या घरासमोर जाऊन आंदोलन केले. यावेळी त्यांनी सचिन आमच्या शेतकरी बापासाठी कधी ट्विट करशील? अशी विचारणा करणारा फलक हाती घेऊन आंदोलन केले.