रविवार, 7 डिसेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 8 फेब्रुवारी 2021 (17:42 IST)

'मी पुन्हा येईन' म्हणणार्‍या फडणवीसांच्या स्वप्नाला अजून २५ वर्ष लागतील - नवाब मलिक

It will take another 25 years for the dream of Fadnavis to say 'I will come again' - Nawab Malik
मुंबई- 'मी पुन्हा येईन' म्हणणार्‍या फडणवीसांच्या स्वप्नाला अजून २५ वर्ष लागतील असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी लगावला आहे. 
 
आम्ही फासे फिरवणार आहोत असे भाजप नेते सांगत आहेत. कुठले फासे फिरवणार आहेत हे आम्हाला माहीत नाही असाही उपरोधिक टोलाही नवाब मलिक यांनी लगावला. 
 
गेले २२ वर्ष नारायण राणे मुख्यमंत्री बनण्याची स्वप्न बघत आहेत. परंतु फासा काही फिरवता आला नाही आणि मुख्यमंत्री होता आले नाही. आता त्यांच्या जोडीला देवेंद्र फडणवीस आले आहेत. त्यांनाही मुख्यमंत्री पदाची स्वप्न पडत आहेत. स्वप्न पाहणे हा त्यांचा अधिकार आहे. आणि फडणवीस यांचे 'मी पुन्हा येईन' ची स्वप्ने पूर्ण होणार नाही. कारण उध्दव ठाकरे यांनी सरकार बनवताना सांगितले होते की सरकार पाच वर्षे नाही तर हे सरकार २५ वर्ष टिकणार आहे आणि तेच घडणार असे नवाब मलिक यांनी स्पष्ट केले.