सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 8 फेब्रुवारी 2021 (16:36 IST)

ज्यांनी हिंदुत्व विकलं त्यांनी आम्हाला हस्तिया आणि नेतृत्वाबद्दल शिकवू नये”

“कौनसी हस्तीया कब डूब जाएंगी’ हे शिवसेनेला  2022 ते 2024 या काळात नक्की कळेल, भारतीय जनता पार्टीकडून जे सांगितलं ते सत्य होतं. भारतीय जनता पार्टीचे शिरस्व नेतृत्व कधी खोटं बोललेलं नाही. या महाराष्ट्रातील जनतेला कोण खोटं बोललं हे माहिती आहे. ज्यांनी हिंदुत्व विकलं त्यांनी आम्हाला हस्तिया आणि नेतृत्वाबद्दल शिकवू नये”, असा हल्लाबोल भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद लाड यांनी केला. 
 
प्रसाद लाड यांनी स्वर्गीय बाळासाहेबांच्या पवित्र खोलीत झालेल्या चर्चेबद्दल आम्ही कधीच खोटं बोलणार नाही, असं म्हणाऱ्या शिवसेना नेते अरविंद सावंत यांनाही उत्तर दिलं. “बाळासाहेब ठाकरेंनी ज्या खोलीत बसून कायम काँग्रेसला विरोध केला, शरद पवार यांच्या नेतृत्वाला विरोध केला. त्याच खोलीत बसून त्याच काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर गटबंधन करण्याचे काम शिवसेनेने केलं. भारतीय जनता पार्टीसाठी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे दैवत. त्यामुळे ज्या शिवसेनेनी बाळासाहेबांच्या रुममध्ये बसून स्वत:ची तत्वनिष्ठा, पक्ष संघटना, हिंदुत्व विकलं त्या अरविंद सावंत यांनी खोलीची गोष्ट करू नये” असा हल्लाबोल प्रसाद लाड यांनी केला.