हिंदुत्वाची खरी शिकवण मिळते ती नागपूरच्या कार्यालयात : आशिष शेलार
हिंदुत्वाची खरी शिकवण मिळते ती नागपूरच्या कार्यालयात, आपण याआधी सतत भेटलो आहोत. आताही त्याठिकाणी जाऊन यावे, असा टोला भाजपाचे आमदार आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लगावला आहे.
दरम्यान, एकीकडे हिंदुत्वाची मक्तेदारी काही भाजपाकडे नाही. देशातील सद्य:स्थिती पाहता लोकांना आता पर्याय हवा असल्याचे दिसते. जनता पर्याय शोधू लागते, तेव्हा तो निर्माणही होतो, असे विधान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लोकसत्ताच्या वर्धापन दिन कार्यक्रमात केले होते. यावर प्रतिक्रिया देताना भाजपाला बाजूला ठेवायच्या कुहेतूचा पर्याय म्हणून दुसऱ्याच्या कुबड्या घेऊन जे सत्तेत आले, त्यांना हे बोलणे शोभत नाही, असे आशिष शेलार म्हणाले.
याचबरोबर, एल्गार परिषदेत काही ना काही गडबड होते व धार्मिक भावना दुखावल्या जातात, अशी पार्श्वभूमी असतानाही परवानगी का दिली, त्यानंतर गुन्हा दाखल करण्यापर्यंत आणि मुंबईतून शरजीलला पळून जाण्यास कुणी मदत केली, हे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट करावे, असे आशिष शेलार म्हणाले.