सोमवार, 8 डिसेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 5 फेब्रुवारी 2021 (15:23 IST)

शुन्याचे शंभर कसे होतील याची धमक आपण ठेवली आहे - जयंत पाटील

Jayant Patil in Yavatmal
यवतमाळ- शुन्य असेल तर त्या शुन्याचे शंभर कसे होतील याची धमक आपण ठेवली आहे. शरद पवार या विचारांचा हा पक्ष आहे. त्यामुळे ऐकीने पक्ष वाढविण्यासाठी कामाला लागा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी यवतमाळ जिल्हा कार्यकारिणी आढावा बैठकीत केले. 

राष्ट्रवादी परिवार संवाद दौरा यात्रा आज नवव्या दिवशी यवतमाळमध्ये पोचली असून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जिल्हा कार्यकारिणी बैठक घेतली. 
 
मला रॅलींची अपेक्षा नाही. मी पक्षासाठी झटणाऱ्या कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी आलो आहे. आपल्या सर्वांना मिळून हा पक्ष बांधायचा आहे. जे खरं आहे ते स्वीकारले पाहिजे असेही जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सांगितले. 
 
यावेळी यवतमाळ जिल्हाध्यक्ष व माजी आमदार ख्वाजा बेग, माजी आमदार संदिप बाजोरिया, आमदार इंद्रनील नाईक, महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, कार्याध्यक्ष रविकांत वर्पे, युवती प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर, विदर्भ दौरा समन्वयक प्रविण कुंटे पाटील, राजेंद्र बढिये आणि पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.