शुक्रवार, 5 सप्टेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 5 फेब्रुवारी 2021 (07:13 IST)

मनसेने…याला म्हणतात, टाईमपास! म्हणत आदित्य यांना सुनावले

called Timepass
आदित्य ठाकरेंनी केलेल्या वक्तव्यावरून मनसे सरचिटणीस किर्तीकुमार शिंदे यांनी ट्वीटरवरून सुनावलं आहे. ‘औरंगाबादचं नामांतर ‘संभाजीनगर’ करू’ यात शिवसेनेने ३० वर्षं घालवली…याला म्हणतात, टाईमपास! ‘मुंबईकरांना चांगले रस्ते, बगीचे, शाळा देऊ’ असं आश्वासन शिवसेना प्रत्येक महापालिका निवडणुकीत देते… याला म्हणतात, टाईमपास! किंबहुना, करोना संकटकाळात लोकांना प्रत्यक्ष मदत करायचं सोडून मुख्यमंत्री उठता- बसता फेसबुक लाईव्ह करत होते… याला म्हणतात, टाईमपास!’ असं किर्तीकुमार शिंदे या ट्वीटमध्ये म्हणाले आहेत.