शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 3 फेब्रुवारी 2021 (07:37 IST)

लवकरच पुन्हा एकदा नाईटलाईफ सुरु होणार : आदित्य ठाकरे

कोरोनानंतर लवकरच पुन्हा एकदा नाईटलाईफ सुरु होणार अशी घोषणा पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे  यांनी केली आहे. त्यामुळे ‘मिशन बिगीन अंतर्गत हळूहळू सर्व बाबी सुरु केल्या, त्यामुळे नाईटलाईफ देखील लवकरच सुरु करु, रेस्टॉरंटही रात्री एक वाजेपर्यंत सुरु ठेवण्याची परवानगी दिली, अशी माहिती आदित्य ठाकरे यांनी दिली आहे. मुंबईत २६ जानेवारी २०२० रोजी नाईट लाईफची सुरुवात झाली. मात्र कोरोनामुळे ही नाईट लाईफ योजना कुठेतरी बारगळी. मात्र आता पुन्हा मुंबईत नाईट लाईफ सुरु करण्यासाठी आदित्य ठाकरे सरसावले आहेत.
 
याबाबत बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, “आता आपण रेस्टॉरंटला 1 पर्यंत सुरु करण्याची परवानगी दिली आहे. हळूहळू आम्ही सर्व बाबी सुरू केल्या आहेत, अजूनपर्यत तरी कोणतीही बाब बंद करण्याची वेळ आलेली नाही. त्यामुळे नाईट लाईफ देखील लवकरच सुरू करू” असे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे. यावेळी त्यांनी रेस्टॉरंटना रात्री 1 वाजेपर्यंत सुरू करण्याला परवानगी देण्यात आल्याच्या निर्णयालाही अधोरेखित केलं.
 
मुंबईत २६ जानेवारी २०२० पासून मुंबईत नाईट लाईफला सुरुवात झाली. त्यानंतर मुंबईत बीकेसी, नरिमन पॉईंट, कालाघोडा या ठिकाणचे हॉटेल, पब, मॉल्स, थिएटर 24 तास खुले ठेवण्याची त्यात परवानगणी देण्यात आली होती. हे सर्व त्यावेळी प्रायोगिक तत्त्वावर सुरु करण्यात आले होते.