शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: शुक्रवार, 29 जानेवारी 2021 (13:51 IST)

मुंबई लोकल 1 फेब्रुवारीपासून सुरू होणार

मार्च 2020 पासून सर्वसामान्यांसाठी बंद झालेली मुंबई लोकल सेवा 1 फेब्रुवारीपासून सर्वसामान्यांसाठी सुरू होणार आहे. सर्व प्रवाशांना सकाळच्या पहिल्या लोकलपासून सकाळी ७ वाजेपर्यंत. त्यानंतर दुपारी १२ पासून दुपारी ४ पर्यंत आणि रात्री ९ पासून शेवटच्या लोकलपर्यंत सर्वसामान्यांना प्रवास करता येणार आहे. मधल्या वेळेत अत्यावश्यक वस्तू सेवा कर्मचाऱ्यांना प्रवास करता येईल.
 
सर्वसामान्य प्रवाशांना सकाळी ७ ते दुपारी १२ व दुपारी ४ ते रात्री ९ या कालावधीत उपनगरीय रेल्वेतून प्रवास करता येणार नाही. या वेळेत फक्त यापूर्वी परवानगी देण्यात आलेल्या विशिष्ट प्रवर्गातील प्रवासी प्रवास करू शकतील.
 
मागील काही दिवसांपासून राज्य सरकारनं लोकल सुरू करण्यातसंदर्भात हालचाली सुरू केल्या होत्या. अखेर आज यासंदर्भात निर्णय घेण्यात आला असून, एक फेब्रुवारीपासून सर्वांना लोकलमधून प्रवास करता येणार आहे. यासाठी सरकारनं विशिष्ट वेळा ठरवून दिल्या आहेत.
 
तसेच दुकानं/आस्थापना रात्री 11 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी आहे. तसंच रेस्टॉरंटही रात्री 1 वाजेपर्यंत सुरू ठेवता येतील. कार्यालयांमध्ये फक्त 30 टक्के कर्मचाऱ्यांनाच ठेवण्याचा नियम यापुढेही सुरू राहील.
 
पण, लोकल सरसकट सगळ्यांसाठी सुरू करायला हवी, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे.