मंगळवार, 28 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: गुरूवार, 28 जानेवारी 2021 (07:43 IST)

येत्या दोन तीन दिवसांत लोकलसेवा सर्वसामान्यांसाठी खुली होणार

गेल्या दहा महिन्यांपासून बंद असलेली मुंबईतील लोकलसेवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासून लोकलसेवा सर्वसामान्यांसाठी खुली होईल, असे मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी सांगितले आहे. राज्य सरकार, मुंबई महानगरपालिका आणि रेल्वे प्रशानसाने लोकलची दारे सर्वसामान्यांसाठी खुली करण्याची तयारी पूर्ण केली आहे.
 
याबाबत अधिक माहिती देताना अस्लम शेख यांनी सांगितले की, मुंबईतील लोकलसेवा सर्वसामान्यांसाठी खुली करण्याची तयारी सुरू आहे. आता मुख्यमंत्री आणि टास्क फोर्समधील अधिकाऱ्यांकडून लोकलसेवा सुरू करण्याबाबत चाचपणी सुरू आहे. त्यांची याबाबत बैठक होणार आहे. तसेच मुंबईतील लोकलसेवा सर्वसामान्यांसाठी खुली करण्याबाबतचा अंतिम निर्णय येत्या दोन तीन दिवसांत होईल.
 
दरम्यान, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनीही आज मुंबईतील उपनगरीय सेवा सुरू करण्याबाबत सकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे. कदाचित २९ जानेवारी किंवा १ फेब्रुवारीपासून लोकल सेवा सर्वसामान्यांसाठी खुली होईल, अशी शक्यता त्यांनी वर्तवली होती.