मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: गुरूवार, 28 जानेवारी 2021 (15:41 IST)

फडणवीस यांच्या टीकेला महेश तपासे यांचे चोख उत्तर

“मुंबई मेट्रो-३ हा प्रकल्प महाविकास आघाडी सरकार पूर्ण करेल यात शंका नाही. परंतु केंद्राकडून वारंवार अडथळा निर्माण केला जात आहे, अशी मुंबईकरांची भावना आहे. त्यामुळे केंद्रासोबत आपण जर संवाद साधलात तर प्रकल्प लवकर पूर्ण होऊ शकेल आणि तुम्हालाही मुंबई मेट्रो-३ मध्ये प्रवास करण्याची व फोटो काढून ट्वीट करण्याची लवकरच संधी मिळेल”, असं उत्तर राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते महेश तपासे यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिलं. याआधी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही नुकतंच एका मुद्द्यावरून महाविकास आघाडीला टोला लगावला होता.
 
“देवेंद्र फडणवीस यांना फोटो काढून ट्वीट करण्याची व फिरण्याची संधी मिळावी ही मुंबईकरांचीही अपेक्षा आहे. महाविकास आघाडी सरकार मुंबईत मेट्रो-३ लवकरच सुरू करेल याचा मला विश्वास आहे. सरकार हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध आहे. परंतु वारंवार केंद्राकडून मदतीऐवजी आडकाठी होत आहे. असे प्रकार थांबले तर मुंबईकरांना लवकर दिलासा मिळेल”, असंही तपासे यांनी नमूद केलं.