मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: गुरूवार, 4 फेब्रुवारी 2021 (15:40 IST)

आदित्य ठाकरे यांनी मनसेची उडवली खिल्ली, म्हणाले मनसे केवळ टाइमपास टोळी

मनसे ही केवळ टाइमपास टोळी असल्याची खोचक टीका  पर्यावरण आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी केली आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. 
 
मुंबईतील चेंबूर येथे आदित्य ठाकरे यांनी मियावाकी वनाची पाहणी केली. यावेळी त्यांनी  विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. मनसेकडून शिवसेनेचा विरप्पन गँग असा उल्लेख करण्यात आला होता. त्याबाबत विचारलं असता आदित्य ठाकरे यांनी मनसेला जोरदार प्रत्युत्तर दिलं. "ती संघटना आहे की पक्ष तेच मला कळत नाही. त्यांचे कार्यकर्ते देखील त्यांच्याकडे जास्त लक्ष देत नाहीत. मग आपण का द्यावं? ही तर टाइमपास टोळी आहे", असं आदित्य ठाकरे म्हणाले. 
 
याआधी मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी शिवसेनेवर हल्लाबोल करत विरप्पन गँगचा पर्दाफाश करणार असल्याचं ट्विट केलं होतं. त्यानंतर सेना आणि मनसेमध्ये जोरदार वाद रंगला होता.