शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : शुक्रवार, 5 फेब्रुवारी 2021 (14:05 IST)

डेटिंग अॅपवर मैत्री केली, पुण्याच्या तरुणीचं 16 तरुणांशी प्रेम आणि त्यांच्या घरात चोरी

27 वर्षीय सयाली काळे, पुण्याच्या पिंपरी चिंचवड भागात राहणारी शिक्षित तरुणी जी नोकरी देखील करत होती. पण साथीच्या आजारात नोकरी सुटल्यामुळे पैशाची कमी भासू लागती तर चुकीचा मार्ग निवडला, ज्यामुळे आता करावास भोगावा लागत आहे.
 
सयालीने डेटिंग अॅपद्वारे 16 तरुणांना प्रेमाच्या जाळ्यात अडकवले. चेन्नईच्या आशीष कुमारने मागील आठवड्यात पोलिसात तक्रार दाखल केली. सयालीने अॅपद्वारे आशीष कुमारसोबत मैत्री केली, नंतर त्याला पुण्यात बोलावले आणि एका हॉटेलमध्ये गेल्यानंतर, आशीषला कोल्डड्रिंकमध्ये मादक पदाँ घोळून पाजले. नंतर त्याच्या शरीरावरील दागिने आणि रक्कम लंपास केली, असं तक्रारीत सांगितले आहे. 
 
या प्रकरणाबद्दल मिळालेल्या माहितीनुसार सयाली उर्फ शिखा काळे सोशल मीडियाच्या टिंडर आणि बंबल डेटिंग अॅपद्वारे तरुणांशी संपर्क करते आणि मैत्री करुन त्यांच्या घरात दाखल होते आणि खाण्या-पिण्याच्या वस्तूंमध्ये मादक पदार्थ मिसळून मौल्यवान वस्तू घेऊन लंपास होते. अशा प्रकारे तिने पिंपरी चिंचवडच्या जवळपासच्या भागातील सुमारे 16 गुन्हेगारीच्या घटना घडवून आणल्या आहेत. नंतर क्राइम ब्रांच यूनिटने तिला अटक केली आहे. 
 
पोलिसांच्या चौकशीत तिने 16 तरुणांना कशा प्रकारे अडकवले हे सांगितले आहे. सयालीने ज्यांच्यासोबत धोका केला आहे त्यांनी समोर येऊन तक्रार नोंदवावी असे आवाहन  पोलिसांनी केले आहे. पोलिसांनी आतापर्यंत तिच्याकडून सोन्याचे दागिने आणि मौल्यवान वस्तूंसह 15,25,000 किमतीचं चोरीचं सामान जप्त केलं आहे.