गुरूवार, 27 नोव्हेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 20 जानेवारी 2021 (21:43 IST)

पिंपरी चिंचवडचे पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश यांना आयर्न मॅन खिताब

police commissioner krishnaprkash pimpari chinchwad maharashtra
महाराष्ट्र पोलिस दलातील पिंपरी चिंचवडचे पोलिस आयुक्त आयपीएस अधिकारी कृष्णप्रकाश यांना "आयर्न मॅन किताब" मिळाला आहे. त्यांच्या नावाचा समावेश "वर्ल्ड बूक ऑफ रेकॉर्ड, लंडन" मध्ये आज करण्यात आला आहे. त्यांचे देशाभरातून कौतुक हेत आहे. 
 
कृष्णप्रकाश हे १९९७ बॅचचे आयपीएस आहेत. महाराष्ट्र पोलिस दलातील एक डॅशिंग, कणखर पण तितकेच संवेदनशील, कायद्यासोबत अध्यात्मिक व संत साहित्यावर प्रचंड पगडा अशी त्यांची ओळख आहे.  
 
भारतीय प्रशासकीय सेवेतील आयपीएस - आयएएस, संरक्षण दल, आर्म फोर्स, सनदी, पॅरामिलिटरी मधील वर्ल्ड बूक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद होणारे आयुक्त कृष्ण प्रकाश हे देशातील पहिलेच अधिकारी ठरले आहेत. या गौरवास्पद कामगिरी करिता वर्ल्ड बूक ऑफ रेकॉर्ड्स लंडनचे सचिव अनुराग पांडेय, सचिव डॉ. प्रदीप मिश्रा यांच्या हस्ते कृष्ण प्रकाश यांना प्रमाणपत्र देण्यात आले.