मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 4 फेब्रुवारी 2021 (17:03 IST)

छगन भुजबळ यांनी दिला सेलिब्रिटींना सल्ला

केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु आहे.पॉप स्टार रेहानाच्या ट्विटनंतर कृषी कायद्यांविरोधात होत असलेल्या शेतकरी आंदोलनाची चर्चा आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरू झाली आहे. पर्यावरणवादी ग्रेटा थनबर्ग पॉर्नस्टार मिया खलिफानेही शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देताना भारत सरकारवर टीका केली. त्यावर, आमच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करु नका अशा शब्दात अनेक भारतीय सेलिब्रिटिंनी त्यांना प्रत्युत्तर दिलं. आता यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी सेलिब्रिटींना एक सल्ला दिला आहे. ‘भारतीय नागरिक म्हणून मी कलाकारांच्या मतांचा आदर करतो.
 
भारतीय कलाकार सांगताहेत की हा आमच्या देशाचा अंतर्गत मुद्दा आहे. मग तुम्ही तरी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोला. तुमच्या देशाचा प्रश्न आहे तर आधी तुम्ही बोलते व्हा. मग परदेशातील कलाकारांना बोला,’ असा सल्ला भुजबळांनी दिला आहे. पुण्यात बोलताना छगन भुजबळ यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं.