सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 1 फेब्रुवारी 2021 (21:45 IST)

अर्थ संकल्पावर मुख्यमंत्र्यांनी दिली थोडक्यात प्रतिक्रिया

अर्थ संकल्पावर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी  थोडक्याच शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे. '' बजेट देशासाठी पाहिजे निवडणुकांसाठी नको. हा देशाचा अर्थसंकल्प आहे निवडणुकांचा नाही. थोडासा अवधी घेऊन मी अर्थसंकल्पावर व्यवस्थित बोलणार आहे.” असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.
 
दरम्यान, आगामी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून पश्चिम बंगाल, केरळ व दक्षिणेकडील राज्यांसाठी या अर्थसंकल्पात मोठ्याप्रमाणावर तरतूद केल्या गेल्याचे दिसत आहे. या पार्श्वभूमीवर विचारण्यात आलेल्या प्रश्नांवर बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ही प्रतिक्रिया दिली.