सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 8 फेब्रुवारी 2021 (09:06 IST)

हिंमत असेल तर मोदींनी ‘अहमदाबाद’ चे नामांतर ‘कर्णावती’ करुन दाखवावे : शिवसेना

हिंमत असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी ‘अहमदाबाद’ चे नामांतर ‘कर्णावती’ करुन दाखवावे, असे आव्हान शिवसेनेचे राष्ट्रीय संघटक हेमराज शाह यांनी दिले आहे. 
 
शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अनुमतीने शिवसेनेच्या ७ फेब्रुवारी २०२१ रोजी मालाड येथे होणाऱ्या शिवसेनेच्या गुजराती भाषिकांच्या मेळाव्यात अहमदाबादचे नामांतर कर्णावती करण्यासाठीचा ठराव एकमताने मंजूर करण्यात येईल, असे सांगून हेमराज शाह म्हणाले की, ‘अहमदाबाद’ला कर्णावती हे नाव आहे. परंतु रीतसर ‘कर्णावती’ हे नाव सरकार दरबारी अधिकृत करण्यात आलेले नाही. अहमदाबादला तेथील जनता कर्णावती म्हणून ओळखते आणि या नांवाला सुद्धा एक इतिहास आहे. 
 
मग परकीय आक्रमण करणाऱ्यांची नावे बदलून आपली अस्मिता जोपासणारी नावे देण्यात हरकत काय आहे? असा सवाल हेमराज शाह यांनी विचारला आहे.