शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : शनिवार, 6 फेब्रुवारी 2021 (22:35 IST)

राज ठाकरे यांनी मोदी सरकारला फटकारले

शेतकरी आंदोलनासंदर्भात भारतरत्न सचिन तेंडुलकर आणि लता मंगेशकर यांनीही ट्विट केलं होतं. या मुद्द्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर राज ठाकरे यांनी मोदी सरकारला फटकारलं आहे.
 
माध्यमांशी बोलताना राज ठाकरे म्हणाले, “सरकारनं या गोष्टी करायला नको. ही सगळी खूप मोठी लोकं आहेत. या लोकांना अशा प्रकारचं ट्विट करायला सांगणं. एकाच हॅशटॅगवर सगळ्या लोकांची ट्विट येणं. ही खूपच मोठी माणसं आहेत. त्यांना सरकारने अशा गोष्टींमध्ये पडायला लावू नये. हा सरकारच्या धोरणाचा विषय आहे. हा काही देशाचा विषय नाही. काही चीनमधून संकट आलंय. पाकिस्तानमधून आलंय. शेतकऱ्यांचं संकट आहेच मोठं, पण या सर्व गोष्टींसाठी सर्व लोकांना… त्या अक्षय कुमारवरती आटपायचा ना विषय. लता मंगेशकर, सचिन तेंडुलकर ही भारतरत्नं आहेत. खूप मोठी माणसं आहेत. त्यांना अशा गोष्टी करायला सांगणं… ती साधी माणसं आहेत. सरकारनं त्यांना सांगितलं, त्यांनी ट्विट केलं, पण आज जे ट्रोल होतंय आज त्यांच्यावरच येतंय,” असं म्हणत राज ठाकरे यांनी सरकारला फटकारलं.