सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 6 फेब्रुवारी 2021 (15:50 IST)

अमित शाह यांच्या राज्यातील आगमनाने राज्य सरकार जावं : नारायण राणे

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या राज्यातील आगमनाने राज्य सरकार जावं, अशी इच्छा भाजपा नेते नारायण राणे यांनी व्यक्त केली आहे. पत्रकार परिषदेत त्यांनी आपल्या मनातील इच्छा बोलून दाखवली. सिंधुदुर्ग येथील लाईफटाईम वैद्यकीय महाविद्यालयाचं उद्घाटन शाह यांच्या हस्ते होणार आहे. याची माहिती देण्यासाठी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
 
राणे म्हणाले, शिवसेनेशी टक्कर देण्यासाठी भाजपा समर्थ आहे. त्यामुळे पुन्हा शिवसेनेसोबत युती करण्याचा प्रश्नच येत नाही. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपाचाच महापौर असेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. तसेच मुंबईतील गुजराती समाज हा मोदी आणि शाह यांच्याव्यतिरिक्त बिनबुडाच्या लोकांकडे जाणार नाही, अशा शब्दांत त्यांनी शिवसेनेवर निशाणा साधला.