शुक्रवार, 12 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 5 फेब्रुवारी 2021 (15:44 IST)

वीजदरवाढ आणि वाढीव वीज बिलांच्या मुद्द्यावर भाजपकडून राज्यभरात टाळाठोक आंदोलन

वीजदरवाढ आणि वाढीव वीज बिलांच्या मुद्द्यावर भाजप आक्रमक झाली आहे. भाजपने राज्यभरात टाळाठोक आंदोलन केले आहे. यावर राज्याचे माजी उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे सरकारने १२ युनिट वीज बिल माफ केले पाहिजेत आणि सुधारित बिलांबाबत नोटीस दिली पाहिजे अशी मागणी भाजपने घेतली आहे. नागपुरात चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात आंदोलन सुरु केले आहे. सरकारने जवळपास ७२ लाख जनतेची मीटर कापण्याची नोटीस बजावली आहे. त्यामुळे राज्यातील कमीत कमी ४ कोटी नागरिक अंधारात येणार आहेत. राज्य सरकार मुघलांसारखे इंग्रजांसारखे वागत आहे. म्हणून आम्ही या सरकारविरोधात, मुख्यमंत्र्यांविरोधा आंदोलन करतो आहे, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे.
 
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले होते की, राज्यातील शेतकऱ्यांचे पैसे माफ केले. शेतकऱ्यांचे तर मागील पाच काळात आम्ही वीजकनेक्शन कधीच कापले नाही. हजारो कोटी थकित असतानाही आम्ही शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन कापले नाही किंवा शेतकऱ्यांकडे पैसे मागितले नाहीत. परंतु राज्य सरकार शेतकऱ्यांना ५० टक्के पैसे भरा असे सांगत आहे. ग्रामपंचायतमध्ये पत्रक आले की, जो पैसे वसूल करेल त्याला १० टक्के कमिशन देऊ. हे सरकार कमिशनवर चालणारे सरकार आहे. असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी आंदोलनावेळी म्हटले आहे.