शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 4 फेब्रुवारी 2021 (07:41 IST)

भाजपकडून द्विस्तरीय शिवगान स्पर्धेचे आयोजन

भाजपा प्रदेश सांस्कृतिक प्रकोष्ठच्यावतीने द्विस्तरीय शिवगान स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ९ फेब्रुवारीपासून सुरु होणाऱ्या या स्पर्धेचा समारोप १९ फेब्रुवारी शिवजयंती दिनी अजिंक्यतारा किल्ल्यावर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील आणि छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या उपस्थितीत होणार आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने राज्यभर शिवजागर होईल, अशी माहिती भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी पत्रकार परिषदेत दिली.
 
केशव उपाध्ये यांनी सांगितले की, ही स्पर्धा राज्यातील ४० ठिकाणी होणार आहे. या स्पर्धेत १५ हजारांहून अधिक स्पर्धक सहभागी होतील. वैयक्तिक आणि सांघिक स्पर्धा एकत्रच होतील, मात्र परीक्षण स्वतंत्रपणे होणार आहे. “शिवगान स्पर्धेत छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील ओवी, आरती, पाळणा, पोवाडा, स्फुर्ती गीत यांचे सादरीकरण केले जाणार आहे.
 
जिल्हास्तरावर पहिल्या तीन क्रमांकाचे आणि उत्तेजनार्थ पुरस्कार दिले जाणार आहेत. प्रथम क्रमांकाला अंतिम स्पर्धेसाठी किल्ले अजिंक्य तारा सातारा येथे स्पर्धेत सहभागी होता येईल. ही स्पर्धा विनाशुल्क आहे. स्पर्धेच्या कालावधीत कोरोना संबंधित शासकीय नियम पालन केले जाईल , असे प्रकोष्ठचे प्रदेश संयोजक ॲड.शैलेश गोजमगुंडे यांनी सांगितले आहे.