1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Updated :मुंबई , गुरूवार, 30 एप्रिल 2020 (13:06 IST)

घरी थांबा आणि सोनं जिंका, लॉकडाउनदरम्यान भन्नाट स्पर्धा

लॉकडाऊन दरम्यान लोकांनी घरातच राहवं यासाठी केरळच्या एका गावात आगळीवेगळी स्पर्धेचं आयोजन करण्यात आले. येथील मल्लपूरम जिल्ह्यातील ताझीककोडे गावातील ग्रामपंचायतीने आयोजित केलेल्या स्पर्धेत घरी थांबणार्‍याला बक्षिस द्यायचे ठरवले. घरात थांबा बक्षिस जिंका स्पर्धा लोकांनी घराबाहेर पडू नये म्हणून आयोजित करण्यात आली. 
 
विशेष आकर्षण म्हणजे या स्पर्धेसाठी पहिलं बक्षिस म्हणून २२ कॅरेट सोन्याचं नाणं, दुसरं बक्षिस रेफ्रीजरेटर आणि तिसरं बक्षिस म्हणून वॉशिंग मशिन देण्याची घोषणा ग्रामपंचायतीने केली. याचबरोबर ५० उत्तेजनार्थ बक्षिसं देण्यात येणार असल्याचेही जाहीर केलं गेलं. लॉकडाउन संपल्यानंतर ही बक्षिसं देण्यात येणार आहे. 
 
या गावात एक हजार कुटुंबं आहेत. लोकांनी आपल्या घरात सुरक्षित राहावं म्हणून या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. ताझीककोडेचे सरपंच नसार यांनी आयएएनएस वृत्तसंस्थेशी बोलताना याबद्दल माहिती देत सांगितले की ७ एप्रिलपासून ही स्पर्धा सुरु झाली. लॉकडाउनच्या कालावधीमध्ये बाहेर भटकणाऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी काही लोकांची नेमणूक केली गेली आहे. भटकताना दिसत असलेल्या लोकांचे कुटुंब स्पर्धेमधून बाद होईल.
 
लॉकडाउन संपल्यानंतर यात भाग घेणार्‍या कुटुंबांकडून घराबाहेर पडलो नाही असा दवा करणारे प्रतिज्ञापत्र घेऊन त्यांना कूपन वितरित केले जातील आणि नंतर लकी ड्रॉ पद्धतीने विजेत्यांची घोषणा करण्यात येईल, असं येथील सरपंच म्हणाले.