मंगळवार, 28 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: नवी दिल्ली , गुरूवार, 30 एप्रिल 2020 (06:48 IST)

Coronavirus : देशातील मृत्यू एक हजारांचवर

देशात कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत 1000 हून अधिक जणांनी प्राण गमावल्याचे समोर येते. धक्कादायक म्हणजे, यातील सर्वात जास्त मृत्यूची नोंद महाराष्ट्रात करण्यात आली. महाराष्ट्रात 400 जणांचा बळी गेला तर गुजरातमध्ये जवळपास 181 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाला.

तसेच मध्य प्रदेशातील मृत्यूंची संख्या 120 वर पोहोचली. देशात जवळपास 31,332 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. या आजारातून जवळपास 7,696 जण बरे होऊन आपल घरी परतले.