शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 5 फेब्रुवारी 2021 (20:55 IST)

आठवले सांगतात ग्रेटा आणि रिहाना तुम बंद करो बहाणा

अमेरिकेच्या पॉप स्टार रिहाना आणि पर्यावरणवादी ग्रेटा थनबर्ग यांनी भारतातील शेतकरी आंदोलनावरून केंद्र सरकारवर टीका करणारे ट्विट केले आहे. त्याला उत्तर देताना रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी “ग्रेटा आणि रिहाना तुम बंद करो बहाणा” असे म्हणत त्यांच्या खास शैलीत सुनावले आहे. ग्रेटा आणि रिहाना तुम्ही केंद्र सरकार वर टीका करण्याचा बंद करा तुमचा बहाणा असे प्रत्युत्तर रामदास आठवले यांनी पॉप स्टार रिहाना आणि ग्रेटा थनबर्ग यांना दिले आहे. 
 
ग्रेटा थनबर्ग या किशोरवयीन पर्यावरण जागृतीच्या कार्यकर्ती आहे. त्यांच्या कार्याचे आम्हाला कौतुक आहे मात्र ग्रेटा यांनी भारतातील अंतर्गत बाबींवर भाष्य करू नये, तसेच इथल्या राजकीय घडामोडीत घुसू नये त्यांनी पर्यावरण जागृतीचे आपले चांगले काम करत राहावे असा सल्ला रामदास आठवले यांनी ग्रेटा थनबर्ग यांना दिला आहे.