शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 5 फेब्रुवारी 2021 (15:48 IST)

पहिलं केंद्राला पेट्रोल डिझेलवरील टॅक्स कमी करण्यास सांगा : अजित पवार

राज्य सरकारने पेट्रोल डिझेलवरील टॅक्स कमी करावेत आणि इंधन भाववाढ नियंत्रणात आणावी, असं म्हणणाऱ्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चांगलाच समाचार घेतला. पहिलं केंद्राला पेट्रोल डिझेलवरील टॅक्स कमी करण्यास सांगा, अशा शब्दात त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना फटकारलं. 
 
“सेनेने मोर्चे काढण्याची नौटंकी करू नये. राज्य सरकारने पेट्रोल डिझेलवरचे टॅक्सेस कमी करावेत आणि भाववाढ नियंत्रणात आणावी. मागच्या काळात आम्ही सरकारमध्ये होतो त्यावेळीही पेट्रोल डिझेल दरवाढ झाली होती. त्यावेळी मी आणि अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवर यांनी पेट्रोल डिझेलवरचा राज्याचा कर कमी केला होता आणि पेट्रोल डिझेलचे दर 2 रुपयांनी कमी केले होते. आताच्या सरकारने पेट्रोल डिझेलवर कर कमी करावा आणि पेट्रोल-डिझेलचे भाव कमी करुन दाखवावेत.”असे फडणवीस यांनी सांगितले होते. 
राज्याच्या करापेक्षा केंद्राचा कर जास्त आहे. महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनी केंद्राला पेट्रोल डिझेलवरील टॅक्स कमी करण्यास सांगावे, अशा श्बात अजित पवार यांनी फडणवीस यांचा समाचार घेतला.