शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. ऑटोमोबाइल
  3. मोबाईल
Written By
Last Modified: मंगळवार, 2 फेब्रुवारी 2021 (15:50 IST)

मास्क घालूनही अनलॉक करता येईल फोन

अनेक स्मार्टफोन कंपन्यांनी आपल्या फोनमध्ये फिंगरप्रिंट सेन्सरऐवजी फेस आयडी सेन्सर देण्यास सुरुवात केली होती पण कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर मास्क लावणे अनिवार्य असून अशात फोन अनलॉक करणं अशक्य होत होतं. तर दुसरीकडे मास्क काढून फोन अनलॉक करणे किंवा पासवर्डच्या सहाय्यानं फोन अनलॉक करणे दोन पर्याय होते. परंतू आ‍ता Apple ने आपल्या नव्या iOS 14.5 च्या बीटा व्हर्जनमध्ये ही समस्या सोडवण्यचा प्रयत्न केला आहे. हे र्व्हजन डाउनलोड केल्यानंतर जरी युझरनं मास्क परिधान केला असेल तरी त्याला आपला फोन अनलॉक करता येणार आहे.
 
तसेच Apple Watch हातात असल्यास युझर मास्क घालून देखील फोन अनलॉक करु शकतो. अर्थात मास्क परिधान केलेला असताना फोन अनलॉक करण्यासाठी अॅप्पल वॉच ची आवश्यकता भासेल. असं असल्यास युझरला फेस आयडी फीचरसह फोन अनलॉक करता येईल.
 
ऑयफोन यूझर्सला आपलं अॅप्पल वॉच हे watch os 7.4 वर अपडेट करावं लागेल. फोन अनलॉक करण्यासाठी अॅप्पल वॉच हातत असलं पाहिजे आणि सोबतच अनलॉक्ड आणि पासवर्ड प्रोटेक्डेटही असणं अनिवार्य आहे.