रविवार, 12 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. योग
  3. योगासन
Written By
Last Modified: मंगळवार, 2 फेब्रुवारी 2021 (17:00 IST)

फॅट कमी करण्यासाठी हे योगासन करावे

आजच्या काळात वजन वाढणे ही सामान्य बाब आहे. चुकीच्या खाण्या -पिण्याच्या पद्धती  बदलत्या जीवनशैलीमुळे वजन वाढण्याचे प्रमाण अधिक झाले आहे. वजन वाढल्याने आरोग्यावर विपरीत परिणाम पडतात. जास्त वजन वाढल्यामुळे अनेक आजार होण्याची दाट शक्यता होते. त्यामुळे लोक वजन कमी करण्यासाठी  वेग-वेगळे उपाय अवलंबवतात. बरेच लोक वजन कमी करण्यासाठी जिम जातात. पण सध्या काही लोक कोरोनाच्या भीतीमुळे घरातच आहे. आपण घरातच राहून काही योगासन करून वाढत्या वजनाला नियंत्रित करू शकता. या मुळे शरीर देखील निरोगी राहते.
 
1 चक्रासन -
या आसनाचा सराव केल्यानं पाठीच्या कणांपासून पोटा पर्यंत ताण येतो. चक्रासन केल्यानं फॅट कमी होत ज्यामुळे वजन देखील कमी होत.
कस करावं -
पायाला दुमडून जमिनीवर झोपा. हाताने पाउले धरून आपल्या कडे ओढा. पाय त्याच स्थितीत ठेवा. हात दुमडून तळहात डोक्या जवळ ठेवा. लक्षात ठेवा की बोटे खांद्याच्या बाजूला असावे. नंतर शरीराच्या मध्य भागाला अलगद उचला.हात आणि पाय जमिनी कडे आणि शरीर उंच  करा. 
 
2 नौकासन -
 नौकासन केल्यानं वजन कमी करता येत. या मुळे पचन तंत्र देखील बळकट होत.
कसं करावं -
सर्वप्रथम दंडासनाच्या अवस्थेमध्ये बसा. पाय पसरवून घ्या. कंबरेवरील भाग सरळ ठेवा आणि हात कंबरेच्या मागे जमिनीवर ठेवा. पाठीला मागे वाकवा. दोन्ही हाताचे कोपरे दुमडून घ्या. पाय देखील गुडघ्या पासून दुमडून घ्या. कुल्हे आणि हातपायाची पाउले जमिनीवर असावी. नंतर पाय वरील दिशेला करून सरळ ठेवा. गुडघे देखील ताठ ठेवा. हात गुडघ्याच्या दिशेने सरळ पसरवून घ्या.
 
3 वीर भद्रासन- 
हे केल्यानं शरीराचं फॅट कमी होतो.
कसं करावं - 
सर्वप्रथम सावधानच्या मुद्रेत उभे राहावं .पाय अडीच ते तीन फूट पसरवून घ्या. नंतर दोन्ही हात खांद्याच्या दिशेने वर घेऊन जा आणि तळहात उघडे ठेवा. उजव्या पायाची पाउले 90 अंशावर वाकवा. लक्षात ठेवा की आपले दोन्ही हात सरळ रेषेत असावे. नंतर उजव्या पायाच्या गुडघ्याला दुमडून घ्या आणि कंबर खालच्या दिशेला न्यावं.या वेळी दुसरा पाय सरळ असावा आणि मान हाताच्या दिशेने वाकवावी.
   
4 भुजंगासन -
ह्या आसनाच्या सराव केल्यानं वजन कमी करता येत.
कसं करावं- 
हे करण्यासाठी सर्वप्रथम पोटावर झोपा. कपाळ जमिनीला लावा आणि दोन्ही पाय आणि टाचा जोडून घ्या. तळहात छाती जवळ खांद्याच्या खाली जमिनीवर ठेवा. नंतर डोकं वर उचला आणि मान मागील बाजूला वळवून खांदे आणि छाती वर उचला.तळहाताने जमिनीला दाबा आणि शरीर वर उचला. नंतर कंबर हळुवार पणे मागे वळवा. शरीराचा पुढील भाग नाभी पर्यंत उचला आणि मान मागे वळवून घ्या. 
 
5 सूर्य नमस्कार -
नियमानं सूर्य नमस्कार केल्यानं शरीर निरोगी राहत. सूर्य नमस्कार हा संपूर्ण व्यायाम असे ही म्हणतात. योग तज्ज्ञांच्या मते, सकाळी 10 वेळा सूर्य नमस्कार केल्यानं संपूर्ण शरीराचा व्यायाम होतो. हे केल्यानं वजन नियंत्रित राहत. नियमितपणे सूर्य नमस्कार केल्यानं प्रतिकारक शक्ती देखील वाढते.