अनेक आजारांना दूर करण्यात फायदेशीर वीरासन
आजच्या काळात खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी आणि बदलत्या जीवनशैली मुळे अनेक आजार उद्भवण्याचा धोका संभवतो.निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी दररोज वीरासन करावं. विरासनाचा सराव करणे खूप सोपे आहे. दररोज विरासनाच्या सरावाने आपण अनेक आजारांपासून दूर राहाल. चला तर मग विरासनाचे फायदे जाणून घेऊ या.
1 दम्याच्या रुग्णांसाठी फायदेशीर -
दम्याच्या रुग्णांसाठी खूप फायदेशीर आहे. ह्याचा नियमित सराव केल्यानं दम्याच्या त्रासापासून सुटका मिळू शकते.
2 उच्च रक्तदाबच्या रुग्णांसाठी फायदेशीर -
विरासनाचा सराव उच्च रक्तदाबाच्या रुग्णांसाठी फायदेशीर आहे. ह्यांच्या सरावाने रक्तदाब नियंत्रणात असतं. रक्त दाब नियंत्रित ठेवण्यासाठी दररोज ह्याचे नियमाने सराव करावे.
3 पचन प्रणाली बळकट होते-
निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी पचन तंत्र बळकट असणे महत्त्वाचं आहे पचन तंत्र मजबूत करण्यासाठी दररोज विरासनाचा सराव करावा. दररोज विरासनाचा सराव केल्यानं पचनाशी निगडित सर्व समस्यांपासून मुक्तता मिळते.
4 मानसिक आरोग्यासाठी फायदेशीर -
वीरासन हे मानसिक आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे.आजच्या धकाधकीच्या जीवनात लोक तणावात असतात. हे तणाव दूर करून त्यांचे मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी दररोज विरासनाचा सराव करावा.