शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 6 फेब्रुवारी 2021 (08:29 IST)

राज्य उत्पादन शुल्क विभागाचा कारवाई, १९ लाखांहून अधिकचा अवैध मद्यसाठा जप्त

दादरा नगर हवेली येथून अवैध मद्याची वाहतूक करणार्‍यांवर राज्य उत्पादन शुल्क विभाग पालघरने कारवाई केली आहे. या कारवाईत 65 बॉक्स मद्य, रोख रक्कम आणि पीकअप टेम्पो, कार असा एकूण 19 लाख 37 हजार 960 रुपये किमतीची मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. याप्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.
 
कुकडे- नागझरी मार्गावर दादरा नगर हवेली येथील विदेशी बनावटीच्या मद्याची अवैध वाहतूक केली जाणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभाग पालघर पथकाला मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे गुंदले गावाच्या हद्दीत एक टेम्पो आणि त्याच्या पाठोपाठ एक स्विफ्ट कार येताना पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी अडवण्याचा प्रयत्न केला असता यावेळी पिकअप टेम्पो चालक टेम्पो तिथेच सोडून फरार झाला. चालकासह स्विफ्ट कार रोखण्यात पोलिसांना यश आले. या दोन्हीही वाहनांची झडती घेतली असता त्यात दादरा नगर हवेली येथून वाहतूक होत असलेलं अवैध मद्य आढळून आलं.
 
पिकअप टेम्पोमधून अवैद्य मद्याची वाहतूक करणारा टेम्पो चालक फरार झाला असून स्विफ्ट कार चालकास उत्पादन शुल्क विभागाने अटक केली आहे. धीरज वसंत पाटील असं अटक आरोपीचं नाव असून त्याच्याविरोधात यापूर्वी देखील तीन गुन्हे दाखल आहेत.