शुक्रवार, 31 ऑक्टोबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: शनिवार, 6 फेब्रुवारी 2021 (07:49 IST)

राज्यात एकूण ३३,९३६ ऍक्टिव्ह कोरोना रुग्ण

A total of 33
राज्यात शुक्रवारी २,६२८ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली असून कोरोना बाधित रुग्णांची संख्या २०,३८,६३० झाली आहे. राज्यात एकूण ३३,९३६ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात ४० कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून, मृतांची संख्या ५१,२५५ वर पोहोचली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.५१ टक्के एवढा आहे.
 
राज्यात  ४० कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. यामध्ये मुंबई ४, कल्याण-डोंबिवली मनपा ५, पुणे १०, यवतमाळ ५, नागपूर ३, वर्धा ३ यांचा समावेश आहे. नोंद झालेल्या एकूण ४० मृत्यूंपैकी १६ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ७ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित १७ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे १७ मृत्यू पुणे ७, ठाणे ५ आणि यवतमाळ ५ असे आहेत.
 
शुक्रवारी ३,५१३ रुग्ण बरे होऊन घरी पाठवण्यात आले आहेत. राज्यात आतापर्यंत एकूण १९,५२,१८७ कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.७६ टक्के एवढे झाले आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,४८,७५,६३३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २०,३८,६३० (१३.७ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १,७७,५६० व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २,०२५ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.